9 वर्षापूर्वी बेपत्ता झालेला कलाकार बनलाय मा’ओवाद्यांचा डेप्युटी कमांडर!

9 वर्षांपूर्वी पुण्यातून बेपत्ता झालेला युवक माओवादी झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संतोष वसंत शेलार उर्फ विश्वा असं या तरुणाचं नाव आहे. छत्तीसगड येथील माओवादी संघटनेत तो सहभागी झालाय. पुण्यातील भवानी पेठेतील कासेवाडी भागात तो राहत होता. नोव्हेंबर 2010 मध्ये तो बेपत्ता झाला होता. त्याच्या बेपत्ता असण्याची तक्रार त्याचा भाऊ संदीप शेलार याने पुण्यातील खडक पोलिसात दिली होती.

संतोष शेलार हा कबीर कला मंचच्या शीतल साठे आणि सचिन माळी या दोघांच्या संपर्कात होता.

तो स्वतः चित्रकार होता.

2010 साली तो पुण्यातून मुंबई येथे चित्रकला स्पर्धेसाठी गेला होता.

त्यानंतर तो आजतागायत घरी परतला नाही.

2014 साली गडचिरोलीच्या जंगलात तो असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

पोलीस त्याच्या शोधात होते, पण तो सापडत नव्हता.

सोमवारी छत्तीसगड पोलिसांनी माओवाद्यांची एक यादी जाहीर केली.त्यात संतोष शेलार हा माओवादी कमांडर असल्याची माहिती समोर आली आहे.

राजनांदगाव येथील तांडा एरिया कमिटीचा तो डेप्युटी कमांडर असल्याचे छत्तीसगड पोलिसांच्या यादीत म्हटलंय. आहे.

मात्र महाराष्ट्र पोलिसांना याविषयी छत्तीसगड पोलिसांनी अद्याप कुठलीही माहिती देण्यात आली नाही.

माहिती मिळाल्यास पुढील तपास करू अशी माहिती खडक पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक उत्तम चक्रे यांनी दिली.

पुण्यातल्या कासेवाडी परिसरात शेलार कुटुंबीय राहतं. या ठिकाणी त्याचा भाऊ आणि वडील राहतात. तो बेपत्ता झाल्यानंतर त्यानी खडक पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. मात्र याला जबाबदार कबीर कला मंचाच्या कार्यकर्ते जबाबदार आहेत. त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी शेलार कुटुंबियांनी केलीय.

Exit mobile version