Wed. Jan 20th, 2021

खासदार संजय काकडे कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार

आगामी लोकसभा निवडणुका कुठल्याही क्षणी जाहीर होणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील सहयोगी खासदार संजय काकडे यांनी भाजप सोडून कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. संजय काकडे यांनी कॉंग्रेेसमधून पुण्यातून निवडणुक लढवणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटलं आहे. आज पुण्यात त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रेवश करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

संजय काकडे यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश –

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे पुण्यातील सहयोगी खासदार संजय काकडे लवकरच भाजप सोडून कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे.

कॉंग्रेस पक्षात लवकरच प्रवेश करणार असल्याचे संजय काकडे यांनी आज जाहीर केले आहे.

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गणेश सातपुते यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

भाजप संजय काकडे, शिवसेना नेत्या आमदार नीलम गोऱ्हे, माजी आमदार मोहन जोशी, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्षप्रवीण गायकवाड, भाजपचे नेते नगरसेवक मुरलीधर मोहोळ या सर्व नेते मंडळीनी  या कार्यक्रमात अनेक विषयावर चर्चा केली.

यावेळी संजय काकडे यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वागणुकीला कंटाळून भाजप सोडण्याचा निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच पुण्याची उमेदवारी मिळण्यासाठी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले.

त्याचबरोबर कॉंग्रेस देईल ती जबाबदारी स्वीकारणार असल्याचे संजय काकडे यांनी म्हटलं आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *