पुण्यात पेस्ट कंट्रोलमुळे दोघांचा मृत्यू

पुण्यात पेस्ट कंट्रोलमुळे दोघांचा मृत्यू झाला आहे.ढेकूण घालवण्यासाठी खोलीत पेस्ट कंट्रोल करण्यात आलं होतं.
ज्या खोलीत पेस्ट कंट्रोल करण्यात आलं होत त्या खोलीतच हे दोघे तरुण झोपले होते. सकाळी दोघेही मृतावस्थेत आढळले.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पेस्ट कंट्रोल या दोन्ही तरुणांच्या जीवावर बेतले आहे.
नेमक काय घडलं?
हे दोघे तरुण एका महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये काम करत होते.
कॅन्टीन मालकाने दोघा तरुणांना राहण्यासाठी एक खोली दिली होती.
या खोलीत ढेकणांचा त्रास होत असल्याने खोलीत पेस्ट कंट्रोल करण्यात आलं होतं.
पेस्ट कंट्रोल केल्यामुळे दोघे तरुण तीन दिवसांसाठी मित्राच्या घरी गेले होते. दोघेही रात्री आपल्या खोलीवर येवून झोपले.
पेस्ट कंट्रोलचा प्रभाव कमी झाला नसल्याने दोघा तरुणांचा मृत्यू झाला.
सकाळी वेळ होऊनही दोघे तरुण कामावर न आल्याने कॅन्टीन मालकाने खोलीत जाऊन बघितले असता दोघेही मृतावस्थेत आढळले.
दोघांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पोलीस तपास करत आहेत.