Tue. Dec 7th, 2021

गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेसाठी कोरोना नियमांची ऐशीतैशी

पुणे: राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढतच आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न केले जात असताना पुण्यात मात्र कोरोनाचे नियम पायदळी तुडवले जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री माधव वाघाटे या सराईत गुन्हेगाराचा निर्घुण खून करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल करीत काही आरोपींना अटक केली आहे. या गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेत आता कोरोना नियमांना पायदळी तुडवली असल्याचे समोर आले आहे.

या अंत्ययात्रेचा एक व्हिडीओ समोर आला असून या गुंडाचे समर्थक मोठ्या संख्येने अंत्ययात्रेत जमा झाले असल्याचे या व्हिडिओ मध्ये दिसत आहे. इतकेच नाही तर या गुंडाच्या समर्थकांनी अंत्ययात्रे दरम्यान रॅली काढली असल्याचेही दिसत आहे.या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी २०० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *