Fri. Dec 3rd, 2021

अन् तो ठरला त्यांचा शेवटचा सेल्फी…

जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी

 

सेल्फी काढण्याच्या नादात पुन्हा मुलांचा बळी गेल्याची घटवा पिंपरीत घडली. पिंपरी रेल्वे स्टेशन जवळील ट्रॅकवर सेल्फी काढताना या दोघांना लोकलची धडक बसली.

 

या धडकेत श्रवण घांची याचा जागीच मृत्यू झाला. तर, भवानी सिंग राठोड हा मृत्यूशी झूंज देत आहे. जखमी भवानी सिंगवर पुण्याच्या हडपसरमध्ये एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

दहावीची परीक्षा दिल्यानंतर ते दोघे मोबाईलचे काम शिकण्यासाठी ते थेरगावमध्ये नातेवाईकाकडे आले होते. पिंपरी रेल्वेस्थानक तिकीट काढण्यासाठी हे दोघे लोहमार्गावरून पायी निघाले होते.

 

मात्र, सेल्फीचा मोह न आवरल्याने दोघे सेल्फीत मग्न झाले. त्यातचं या दोघांच्या कानात हेडफोन असल्यामुळे लोकलचा आवाज त्यांच्या कानात पोहचला नाही आणि त्याच्या आयुष्यातला तो शेवटचा सेल्फी ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *