Wed. Jul 28th, 2021

कात्रज घाटात पन्नास फूट खोल दरीत कोसळली शिवशाही बस

पुण्याहून सातार्‍याच्या दिशेने निघालेली परिवहन महामंडळाची शिवशाही बस कात्रज घाटात पन्नास फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला आहे . या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून 24 प्रवाशी जखमी झाले आहेत. दुपारी साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी दत्तात्रय दराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस पुण्याहून सांगलीच्या दिशेने जात होती.

कात्रज बोगदा ओलांडल्यानंतर शिंदेवाडी गावाजवळ बसला अपघात झाला आणि ही बस खोल दरीत कोसळली.

यामध्ये दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 24 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून खेड-शिवापूर येथील रुग्णालयात दाखल केले आहे.

अपघातानंतर काही काळ पुणे सातारा रस्त्यावर वाहतुक कोंडी झाली आसून पोलिस प्रशासन वाहतूक कोंडी सुरळीत करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *