Wed. Jan 20th, 2021

तुरटीपासून साकारलेला ‘विशेष’ बाप्पा !

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

आजवर बाप्पाची विविध रुपं आपण पाहिली असतील, पण पुण्यातील एका गृहस्थांनी पर्यावरणाचा विचार करत बाप्पाची विशेष मूर्ती साकारली आहे. पुण्यातील प्रभात रस्ता

भागात राहणारे रमेश खेर यांनी तुरटीची गणेशमूर्ती साकारली आहे. १०० टक्के पर्यावरणपूरक अशी ही मूर्ती आहे. गेल्या ६ वर्षांपासून ते हा बाप्पा घरी बसवत आहेत.

 

याबाबत सर्वांगीण चर्चा होऊन मूर्तींचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा हीच त्यांची अपेक्षा आहे. या गणपतीच्या विसर्जनाने प्रदूषण न होता नदी शुध्द होते. तुरटी पाण्याला

निवळते. गाळ खाली बसून पाणी काही अंशी शुध्द होते. यामुळे काही प्रमाणात का होईना प्रदूषणाला आळा घालण्यास हातभार लागेल. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *