Wed. Jun 16th, 2021

केदार जाधवसह अन्य दोघांना ‘युवा गौरव पुरस्कार’ जाहीर

टीम इंडियाचा खेळाडू आणि पुणेकर असलेल्या केदार जाधवच्या शिरपेचात मानाता तुरा रोवला गेला आहे. सावित्रीबाई पुणे विद्यापीठातर्फे देण्यात येणारा युवा गौरव पुरस्कार केदार जाधवला जाहीर झाला आहे.

पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष आहे.

केदार जाधवसह मराठी सिनेअभिनेत्री मुक्ता बर्वे आणि युवा नाटककार धर्मकिर्ती सुमंत यांनाही हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

पुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. देश पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांना हा पुरस्कार जाहीर केला जातो. विशेष म्हणजे ४० वर्षाखालील विद्यार्थ्यांनाच या पुरस्काराने गौरवण्यात येते.

पुरस्काराचे स्वरुप

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १० फेब्रुवारीला वर्धापन दिन असतो. या निमित्ताने हा पुरस्कार दिला जाणार आहे. या मान्यवरांना १० फेब्रुवारीला पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मानपत्र आणि २५ हजार असे या पुरस्काराचे स्वरुप असणार आहे.

केदार जाधव

केदार जाधवने टीम इंडियासाठी एकूण ७२ वनडे सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. केदारने अनेक सामन्यात निर्णायक भूमिका बजावली आहे. तसेच सध्या टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. यातील वनडे मालिकेसाठी केदार जाधव खेळत आहे.

मुक्ता बर्वे

मुक्ता बर्वे यांनी अनेक मराठी सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. जोगवा, मुंबई-पुणे-मुंबई, डबल सीट यासारख्या सिनेमातून मुक्ता बर्वे यांनी रसिकांच्या मनात घर केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *