Mon. Dec 6th, 2021

पुण्यात पावसाचा हाहाकार ! भिंत कोसळल्याने 5 जणांचा मृत्यू

राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत असताना पुणे शहराला मुसळधार पावसाने झोपडपले आहे. बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे नागरीकांच्या राहत्या घरी पाणी शिरत आहे. त्यातच पुण्यातील अरण्येश्वर परिसरात असलेल्या आंबील नाल्याचे पाणी टांगेवाला कॉलनीत शिरल्यामुळे एका घराची भिंत कोसळली आहे. यामध्ये 5 जणांचा मृत्यू आणि पाच जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. बेपत्तांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफचे पथक शोध घेत आहे.

नेमकं काय घडलं ?

पुण्यात मुसळधार पाऊस पडत असून अनेक भागात पाणी तुंबायला सुरुवात झाली आहे.

पुण्यातील सर्व रस्त्यांवर पाणीच पाणी झाले असून नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबण्यास सुरुवात झाली आहे.

आंबील ओढ्याला पूर आल्यामुळे कात्रज ते दांडेकर पुलापर्यंत असलेल्या रहिवाशांच्या घरी शिरले आहे.

तसेच या आंबील ओढ्याचे पाणी टांगेवाली कॉलनीत शिरल्यामुळे भिंत कोसळली.

भिंत कोसळल्यामुळे 5 जणांचा मृत्यू झाला असून पाच जण बेपत्ता आहेत.

एनडीआरएफच्या पथकाने शोध मोहिमेला सुरुवात केली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

वस्त्यांमध्ये आणि अनेकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

पथकाला एका कारमध्ये मृतदेह अढळल्याचे समोर आले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *