Mon. Dec 6th, 2021

पुण्यात पुन्हा भिंत कोसळून 6 जणांचा मृत्यू, 3 जण जखमी

पुण्यातील आंबेगाव येथे सीमाभिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले आहेत. यामध्ये हे सर्वजण बांधकाम मजूर होते.

पुण्यातील आंबेगाव येथे सीमाभिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले आहेत. यामध्ये हे सर्वजण बांधकाम मजूर होते. कोंढव्यातील 15 जणांचा बळी घेणारी दुर्घटना ताजी असतानाच त्याची पुनरावृत्ती झाल्याची आणखी एक घटना घडली. मुसळधार पावसामुळे आंबेगाव येथील सीमाभिंत मजुरांच्या झोपड्यांवर कोसळून मध्यरात्री दीडच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे.

पुण्यात दुर्देवी घटनेची पुनरावृत्ती

पुण्यातील आंबेगाव येथे सीमाभिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर तिघे जण जखमी झाली आहेत.

आंबेगाव बुद्रुक परिसरात सुरू असलेल्या एका बांधकाम साईटवर हे मजूर काम करत होते.जवळच त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

सिंहगड कॅम्पसच्या सीमाभिंतीलगत या मजुरांच्या तात्पुरत्या झोपड्या होत्या. सर्वजण गाढ झोपेत असताना हा सीमाभिंत अचानक कोसळली आणि त्याखाली मजुरांच्या झोपड्या गाडल्या गेल्या.

पडलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली मजूर आणि त्यांचे कुटुंबीय अडकून पडले होते. दुर्घटनेचे माहिती समजताच पुणे महापालिकेच्या अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले त्यांनी युद्धपातळीवर बचवकार्याला सुरवात केली.

आतापर्यंत अग्निशामक दलाने सहा पुरुष व तीन महिलांना जखमी अवस्थेत बाहेर काढले. त्यापैकी सहाजणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

मयतामध्ये चार पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे.या घटनेत एकूण ११ जण असल्याची माहिती पोलिसानी दिली आहे.

मृतामध्ये चार छत्तीसगड तर दोन मध्यप्रदेश येथील राहिवासी आहेत.हे कोणाचे बांधकांम आहे.

कोणाचा हलगर्जीपणा आहे याचा तपास पोलिस करत आहेत.या ठिकाणचे सर्व रेस्कू थांबवण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *