Mon. Oct 25th, 2021

पुणे शहरात शनिवारी आणि रविवारी टाळेबंदी

पुणे: पुणे महापालिका हद्दीत पुन्हा एकदा शनिवारी आणि रविवारी टाळेबंदी लावण्यात आली आहे. पुणे महापालिकेने आदेश जारी केले असून महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. शनिवारी आणि रविवारी टाळेबंदीमधून अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना मात्र सूट देण्यात आली आहे.

पुणे महापालिका हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा हे शनिवार आणि रविवार पूर्णपणे बंद राहणार आहेत, तर हॉटेलमधून शनिवारी आणि रविवारी केवळ पार्सल सेवा सुरु असेल.

पुढील आदेशापर्यंत हा आदेश लागू असणार असून यासोबतच प्रतिबंधात्मक आदेशही जारी करण्यात आला आहे. त्यानुसार रात्री १० वाजल्यानंतर वैध कारणाशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही.

काय आहेत टाळेबंदीचे नियम?

  • जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आठवड्याचे सर्व दिवस सायंकाळी सात वाजेपर्यंत खुली राहतील
  • इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर शनिवार आणि रविवार बंद राहणार
  • हॉटेल, बार, फूड कोर्ट ग्राहकांसाठी शनिवार-रविवार बंद राहतील. केवळ पार्सल सेवेची मुभा. रात्री ११ वाजेपर्यंत पार्सल देता येईल
  • हॉटेल, बार, फूड कोर्ट सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील
  • शनिवार आणि रविवार वगळता अन्य दिवशी मॉल ५० टक्के ग्राहक क्षमतेने सुरू ठेवता येतील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *