पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदीर भाविकांसाठी खुलं
प्रदीर्घ कालावधीनंतर आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन झाल्यानं भाविकांच्या चेहऱ्यावरही एक वेगळाच आनंद…

दिवाळीतील पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर राज्यातील मंदीर सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. प्रदीर्घ कालावधीनंतर आज मंदिर खुली केल्यानं राज्यात ठिकठिकाणी भक्तांची गर्दी उसळून आली आहे.
पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदीर भाविकांसाठी आज खुलं झालं आहे. या मंदिरात सरकारी नियम पालन होतांना दिसत आहे. मंदिरात सकाळपासून भाविकांनी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिर प्रशासनाकडून स्वच्छता, सॅनिटायजेशन, सोशल डिस्टन्सिंग असे सर्व नियम तंतोतंत पाळले जात आहेत.
शिवाय नकळतपणे हा श्वानही बाप्पासमोर नतमस्तक झाल्यानं या श्वानची चर्चा हातांना दिसत आहे. काही भाविकांनी मंदीराबाहेर उभं राहून दर्शन घेणं पसंत केलं आहे. आज पहिल्याच दिवशी २ हजारपेक्षा जास्त लोकांनी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं आहे.
प्रदीर्घ कालावधीनंतर आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर भाविकांच्या चेहऱ्यावरही एक वेगळाच आनंद दिसून येतं असल्याचं दिसत आहे. मंदिर सुरू झाल्यानं भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष सुरू आहे. त्यामुळं आज पुण्यामध्ये भाजपा कार्यकर्त्यां द्वारे महाआरती करण्यात आली.