Mon. Jun 1st, 2020

#IPL2019 – पंजाब विरूद्ध सामन्यात राजस्थानचा पराभव

 

पंजाब विरूद्ध राजस्थान या सामन्यात पंजाबने राजस्थानला 184 धावांचे आव्हान दिले होते. मात्र राजस्थानने 170 धावा करत आपला खेळ आटोपला. राजस्थानने 170 धावा केल्यामुळे पंजाबच्या संघाने 14 धावांनी विजय मिळवला आहे. या रोमांचक सामन्यात पंबाज संघाचा फलंदाज गेलने 79 धावा केल्यामुळे पंजाबला सामाना जिंकण्यास फायदा झाला आहे. राजस्थानमधील जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये हा सामाना रंगला.

पंजाब विरूद्ध राजस्थान –

राजस्थान येथील जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये पंजाब आणि राजस्थानमध्ये सामना झाला.

नाणेफेक जिंकून राजस्थानने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

पंजाबने प्रथम फलंदाजी करत राजस्थानला 184 धावांचे आव्हान दिले.

या आव्हानाचे पाठलाग करत असताना राजस्थानने 170 धावा करत खेळ आटोपला.

पंजाबच्या गेलने सर्वाधिक 79 धावा केल्या.

राजस्थानचा कर्णधार रहाणे आणि बटलरने चांगली कामगिरी बजावली.

रहाणेने 27 धावा केल्या तर बटलरने 69 धावा केल्या आहेत.

मात्र हे दोन्ही खेळाडू बाद झाल्यानंतर राजस्थान संघाला गळती लागण्यात सुरुवात झाली.

त्यामुळे राजस्थानला पराभव स्विकारावा लागला.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *