पंजाबी गायक दलेर महेंदी यांचा भाजपात प्रवेश

लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज राजकीय नेत्यांसह कलाकारही पक्षप्रवेश करत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता सनी देओलने भाजपात प्रवेश केल्यानंतर पंजाबी गायक दलेर मेहंदी यांनी सुद्धा भाजपात प्रवेश केला आहे. भाजपाचे दिल्लीचे अध्यक्ष मनोज तिवारी आणि केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. भाजपात प्रवेश केल्यानंतर सनी देओलला पंजाबच्या गुरुदासपूरमधून उमेदवारी जाहीर केली. तसेच माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरलाही दिल्ली पूर्व येथून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे दलेर मेहंदी यांना उमेदवारी देणार का ? आणि कुठून देण्यात येईल ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
कोण आहे दलेर महेंदी ?
बिहारच्या पटना येथे 18 ऑगस्ट 1967 रोजी दलेर महेंदी यांचा जन्म झाला.
वयाच्या 5 वर्षापासूनच त्यांनी गाणं शिकण्यास सुरुवात केली.
1995 साली दलेर महेंदी यांनी आपला पहिला अल्बम रेकॉर्ड केला.
या अल्बमचे नाव ‘बोलो ता रा रा’ असे असून हा अल्बम प्रचंड गाजला होता.
या अल्बमचे 20 million कॉपींचा खप झाला होता.
1998 साली दलेर महेंदीने ‘तुनक तुनक’ हा अल्बम रिलीझ केला.