Sun. Aug 25th, 2019

‘गल्ली बॉय’चं नव्हे, ‘दिल्ली गर्ल्स’चं गाणं ‘पूरा बहुमत आएगा’!

22Shares

लोकसभा निवडणुका काही महिन्यांवरच असल्यामुळे राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचार करायला सज्ज झाली आहे. यावेळी प्रचारासाठी सोशल मीडियाचा चांगलाच वापर करण्यात आला आहे. भाजप तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत आहे. 2014 साली भाजपने प्रचारासाठी  सोशल मीडियाचा प्रचंड वापर केला होता.

भाजप समर्थकांचा सोशल मीडियावर प्रचार

रणवीर सिंगच्या गल्ली बॉय सिनेमातील ‘अपना टाईम आएगा’ हे रॅप सॉंगचा सुपरहिट झालंय.

यामुळे भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थकांनी ‘पूरा बहुमत आएगा’ असा रॉप सॉंग बनवलं आहे.

हे गाणं दिल्लीतील दोन चुलत बहिणींनी रॅप तयार केला आहे.

न्योनिशी कजीन्स या यु-ट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे.

हे गाणं न्योनिका आणि इशिता या बहिणींनी तयार केले आहे.

 

सध्या तरुण वर्गात रॅप सॉंग धुमाकुळ घालत आहेत. यामुळे तरुणाईला आकर्षित करण्यासाठी असं रॅप सॉंग तयार करण्यात आलं आहे. मात्र फक्त मनोरंजनासाठी ‘पूरा बहुमत आएगा’ हे गाणं तयार केल्याचे या दोघींचे म्हणणे आहे.

22Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *