Wed. Oct 5th, 2022

घारापुरी बेटावर मिळणार शुद्ध पिण्याचे पाणी

सरत्या वर्षात उरण तालुक्यातील घारापुरी बेटावरील दोन गावांना आनंदाची बातमी आहे. आता या दोन गावांना स्वच्छ पाणी उपलब्ध होणार आहे. पर्यटन केंद्र असूनही विकासाला तहानलेल्या घारापुरी बेटावर मागणीप्रमाणे स्वच्छ पाणी पुरवणाऱ्या वॉटर एटीएमच्या उभारणी आणि लोकार्पणाचा सोहळा घारापुरी बेटावर बुधवारी पार पडला.

या जलशुद्धीकरण प्रकल्पामुळे या बेटावरील ग्रामस्थांना गावातच शुद्ध पिणाचे पाणी सहज उपलब्ध होणार आहे. तर येथे येणाऱ्या पर्यटकांनाही शुद्ध पाणी मिळणार आहे. सुमारे बाराशे लोकवस्तीसह रोजचे पाच हजार पर्यटक इतका राबता असलेल्या घारापुरी बेटावर गोड्या पाण्याचे जलाशय असले तरी सर्वांसाठी सुलभ अशी जलव्यवस्था नव्हती. ग्रामस्थ आणि तहसील कार्यालयाच्या सूचनेप्रमाणे इंडियन ऑइल टँकिंगने आपल्या सीएसआर निधीतून जलशुद्धीकरण प्रकल्प घारापुरी येथे उभारला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.