Fri. Aug 6th, 2021

२० रुपयांच्या नोटवरील ‘मेसेज’ व्हायरल

सध्याला एक २० रुपयांच्या नोटवरील ‘मेसेज’ व्हायरल होत आहे. या नोटवरील मॅसेज हा थोडा गंमतीशीर आहे. एकेकाळी प्रियकर-प्रेयसी एकमेकांना कबुतराच्या माध्यमातून प्रेमपत्र पाठवत असत. मात्र आता नवी माध्यमे आली आहे तर आजकाल व्हाट्सऍप द्वारे किंवा फोनवर मॅनेज करतात मात्र आताही या काळात चक्क नोटवर मॅसेज लिहण्यात आला आहे. एका प्रेयसीनं २० रुपयांच्या नोटेवर तिच्या प्रियकारासाठी विशेष संदेश लिहिला आहे.

या प्रेयसीचं लवकरच लग्न होणार आहे. मात्र तिला प्रियकरासोबत पळून जायचं आहे. त्यामुळे पळवून नेण्यासाठी प्रेयसीनं प्रियकराला साद घातली आहे. त्यासाठी तिनं २० रुपयांच्या नोटवर एक खास संदेश लिहिला आहे. ‘प्रिय दीपूजी, २६ एप्रिलला माझं लग्न आहे. मला तुमच्यासोबत पळवून न्या. तुमची पुष्पा. आय लव्ह यू,’ असा मजकूर नोटेवर आहे. पुष्पा नावाच्या एका तरुणीचा २६ एप्रिलला विवाह होणार आहे. मात्र तिला विवाह करायचा नाही. तिला तिचा प्रियकर दीपूसोबत पळून जायचं आहे, ही गोष्ट २० रुपयांच्या नोटेवरील मजकुरामुळे स्पष्ट झाली आहे. आता या प्रेमकहाणीचा शेवट कसा होणार याची कल्पना कोणालाही नाही. काही महिन्यांपूर्वी ‘सोनम गुप्ता बेवफा है’ असा मजकूर असलेल्या एका नोटेचा फोटा व्हायरल हा झाला होता. आता सध्या इंटरनेटवर ही २० रुपयांची नोट चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर तही नोट जोरदार व्हायरल झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *