Jaimaharashtra news

बॅटमिंटनपटू पी.व्ही. सिंधूची विजयी सलामी

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील चॅम्पियन आणि रिओ ऑलिम्पिकची रौप्य पदक विजेत्या पीव्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये विजयी सलामी दिली. बॅडमिंटन महिला एकेरीत तिने इस्त्रायलच्या सेनिया पोलिकारपोवा हिला पराभूत केले. जागतिक क्रमवारीत ७ व्या स्थानावर असलेल्या सिंधूनं ५८ व्या मानांकित प्रतिस्पर्धी खेळाडूला अवघ्या २८ मिनिटात २१ -७, २१-१०असे पराभूत केले. दुसऱ्या फेरीत सिंधूची लढत ही ३४ व्या स्थानावर असलेल्या हाँकाँगच्या चियुंग एंगान यी हिच्याशी होणार आहे.
टोकियो – रियो ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेती भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने यंदाच्या ऑलिम्पिकमधील आपल्या अभियानाची दमदार सुरुवात केली आहे.
भारताची पी.व्ही. सिंधू आणि इस्राइलची केसेनिया पोलिकारपोव्हा यांच्यातील लढत कमालीची एकतर्फी झाली. सिंधूने या लढतीवर सुरुवातीपासून वर्चस्व राखले. पहिल्या गेममध्ये २१-७ अशी बाजी मारल्यानंतर सिंधूने दुसरा गेमही २१-१० असा आरामात जिंकला आणि अवघ्या २८ मिनिटांमध्ये सामना खिशात घातला.

Exit mobile version