Sat. Aug 13th, 2022

अभिनंदन सिंधू! टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला दुसरं पदक!

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने कांस्यपदक पटकावत इतिहास रचला आहे. आज पार पडलेल्या कांस्यपदकाच्या लढतीत सिंधूने चीनच्या ही बिंग जिआओचा २१-१३, २१-१५ असा पराभव केला आहे.

टोकियो ऑलिम्पिकमधील विजयासह पी. व्ही. सिंधू ही ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. सिंधूने २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकलं होतं.

बिंग जिआओविरुद्धच्या सामन्यात सिंधूने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ दाखवत पहिल्या डावामध्ये ११-८ अशी आघाडी घेतली. यानंतर १६-१०, १९-१२ अशी आघाडी टिकवली आणि पहिला डाव २१-१२ असा जिंकला. दुसऱ्या खेळामध्येही भारतीय शटलरने चांगली सुरुवात केली आणि ५-२ अशी आघाडी घेतली. सिंधूने मात्र कमी चुका करून आघाडी कायम राखली आणि जिआओने पुन्हा ११-११अशी बरोबरी साधली पण विश्वविजेत्या सिंधूने १६-१३ अशी आघाडी घेतली.

ताई त्झू यिंगने सिंधूचा पराभव केल्यामुळे सिंधूला सुवर्ण पदकापासून दूर राहावं लागलं. कांस्य पदकासाठी सिंधूने चीनच्या बिंग जिआओवर मात केली आणि कांस्य पदक पटकावलं आहे.

 

राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून पी. व्ही. सिंधूचं अभिनंदन

टोकियो ऑलिम्पिकमध्ये पी. व्ही. सिंधू हिने कांस्यपदक जिंकल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत सिंधूचं अभिनंदन केलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.