Sat. Sep 21st, 2019

पी.व्ही सिंधूची ऐतिहासिक कामगिरी; पंतप्रधान मोदींसह सचिननेही केले अभिनंदन

0Shares

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सिंधूने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचं जेतेपद मिळवणारी ती पहिलीच भारतीय ठरली असून सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहाराला पराभूत केले आहे.

पी.व्ही सिंधूची ऐतिहासिक कामगिरी –

पी. व्ही सिंधूने स्पर्धेच्या अंतिम लढतीत जपानच्या नोझोमी ओकुहाराला 21-7, 21-7 असं पराभूत केले आणि विजयी मिळवला.

सेमीफायनलमध्ये चीनच्या चेन यू फेईचा 21-7, 21-14 असा दोन सरळ गेम्समध्ये पराभव करत फायनलमध्ये धडक मारली.

या विजयासह सिंधूने 2017च्या जागतिक स्पर्धेतील फायनलमध्ये ओकुहाराकडून झालेल्या पराभवाची परतफेडही केली.

सिंधूच्या या ऐतिहासिक कामगिरी नंतर आता संपूर्ण देशभरातून सिंधूवर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करत सिंधूचं अभिनंदन केले.

तर माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही सिंधूच्या या ऐतिहासिक विजयाबद्दल कौतुक केले.

राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनीही ट्विट करत सिंधूचे अभिनंदन केले आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *