Thu. Jul 2nd, 2020

पी. व्ही. सिंधूची ऐतिहासिक कामगिरी, ‘ही’ स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय

भारताच्या बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने BWF World Tour Finals स्पर्धेतील महिला गटाचे जेतेपद पटकावले आहे. तिने कारकिर्दीतील 300व्या विजयाची नोंद करताना जपानच्या नोझोमी ओकुहाराचा पराभव केला. BWF World Tour Finals स्पर्धा जिंकणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. तसेच 2018 मधील तिचे हे पहिलेच जेतेपद आहे. सिंधूने अंतिम लढतीत 21-19, 21-17 असा विजय मिळवला आहे.

सिंधूचे हे कारकिर्दीतील 14वे जेतेपद आहे. 2013 साली सिंधूने येथेच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पहिले पदक जिंकले होते आणि आज म्हणजेच रविवारी सिंधूने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेत तिने पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले आहे.

यापूर्वी तब्बल 12 वेळा आमनेसामने आलेल्या या दोघींनी प्रत्येकी सहा वेळा बाजी मारली आहे. त्यामुळे या दोघींच्या आजच्या लढतीकडे संपूर्ण बॅडमिंटन जगताचं लक्ष लागलं होतं. पण कोणत्याही दबावाखाली न येता सिंधूने खेळाचं दर्शन घडवत ओकुहारावर मात केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *