भारतातील कोरोनाबळींच्या संख्येवर प्रश्नचिन्ह

कोरोनामृतांची जागतिक आकडेवारी जाहीर करण्याच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रयत्नांमध्ये भारत अडथळे आणत असल्याचा दावा अमेरिकेच्या माध्यमाने केला आहे. या आरोपांमुळे भारतातील कोरोनाबळी नक्की किती, याबाबत सर्वत्र संभ्रम निर्माण झाला आहे. कोरोनामुळे जगभरात साठ लाख मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेच्या मते ही आकडेवारी दीड कोटी आहे, तर भारतात ४० लाख नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेचे दावे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने फेटाळून लावले आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार उडवला आहे. कोरोनाच्या सूक्ष्म विषाणूने संपूर्ण जग हादरले. या पार्श्वभूमीवर सर्वत्र टाळेबंदीची घोषणा करण्यात आली होती. तर कोरोना नियम पाळण्याचे आदेशही देण्यात आले होते. संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात उपचारांची दिशा ठरलेली नव्हती, तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार माजवला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण काही प्रमाणात आटोक्यात आल्यानंतर तसेच कोरोना लसीकरणावर भर पडल्यामुळे कोरोना निर्बंध हटवण्यात आले आहेत.
देशातील कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचा इशारा देण्यात आला होता. परंतु, या लाटेत लहानग्यांना संसर्ग कमी झाल्याचे समोर आले आहे. मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यामुळे निर्बंध हटवले गेले.
भारताने मृतसंख्येचा घोषित केलेला आकडाच चुकीचा असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हंटल्यामुळे खळबळ उडाली आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका सांगितलं होता मात्र संसर्गाचे प्रमाण कमी आढळून आले.
काय आहे आकडेवारी (१- १० वर्ष वयोगट)
पहिली लाट रुग्ण ६७,११० मृत्यू ९७
दुसरी लाट रुग्ण १,४६,२९८ मृत्यू ११७
तिसरी लाट रुग्ण ३४,३४९ मृत्यू १८
एकूण रुग्ण २,४७,७५७ मृत्यू २३२