Mon. Jul 22nd, 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दलच्या ‘त्या’ ट्विटवरून काँग्रेसवर संतापला आर.माधवन

334Shares

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे सध्या सगळेच पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. यामध्ये भाजपा आणि काँग्रेस पक्षात आरोप-प्रत्यारोप होत आहेत.

यातच काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाने त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हॅण्डलवर पंतप्रधान मोदींवर टीका करणारा व्हिडिओ शेअर केला होता.

हा व्हिडिओ पाहुन बॉलिवूड अभिनेता आर. माधवनने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देत काँग्रेसने शेअर केलेल्या व्हिडिओचा निषेध केला आहे.

14 मार्चला सकाळी 9.12 वाजता काँग्रेसच्या ट्विटर हॅण्डलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यातील संवादाचा एक व्हिडिओ शेअर केला होता.

हा व्हिडिओ एडिट केलेला असून यात पंतप्रधान मोदी यांची खिल्ली उडविण्यात आली आहे.

त्यासोबतच #HugplomacyYaadRakhna हा हॅशटॅगही वापरण्यात आला आहे. त्यामुळे सध्या काँग्रेसचे हे ट्विट चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे.

हे ट्विट पाहिल्यानंतर माधवनने नाराजी व्यक्त केली आहे.

“सध्या देशात निवडणुकीची धामधूम सुरु असल्यामुळे प्रत्येक पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारच.

मात्र नरेंद्र मोदी हे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्यावर अशी टीका करणे योग्य नाही.

या व्हिडिओमध्ये तुम्ही त्यांच्यावर टीका करताय पण ही टीका करत असताना चीनसमोर आपल्याच राष्ट्राची बदनामीही करताय.

काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाकडून ही गोष्ट होणं खरंच अपेक्षित नव्हतं”, असे आर. माधवनने म्हटले आहे.

334Shares

Leave a Reply

%d bloggers like this: