Mon. Dec 6th, 2021

कुठलं बटण दाबू ? मतदान करताना राधाकृष्ण विखे पाटलांचा मिश्कील प्रश्न

लोकसभा निवडणुकीच्या देशातील चौथ्या आणि राज्यतील शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरु असून नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिमबंगाल, महाराष्ट्र, झारखंड, ओडिशा, मध्य प्रदेश, राजस्थान, जम्मू-कश्मीरसमवेत 9 राज्यात 71 जांगावर मतदान होत आहे. चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात उर्वरित 17 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. यावेळी अनेक दिग्गज नेत्यांसह कलाकारांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावाला आहे. कॉंग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा शिर्डी मतदारसंघातून मतदानाचा हक्क बजावला. मात्र मतदान बूथवर मतदान करताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी मिश्कील प्रश्न उपस्थितांना विचारला.

काय होता राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रश्न ?

राज्यातील १७ जागांवर मतदान पार पडत आहे.

कॉंग्रेसचे नाराज नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.

शिर्डी मतदारसंघातून त्यांनी मतदान केले.

मतदान केंद्रावरील बूथवर मतदान करताना विखे पाटील यांनी उपस्थितींना प्रश्न उपस्थित केला.

कोणतं बटण दाबू असा मिश्कील प्रश्न विखेंनी उपस्थितींना विचाराला.

राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती.

त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॉंग्रेसमधून राजीनामा दिला.

त्यामुळे ते शिवसेना किंवा भाजपात प्रवेश करणार का ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

या कारणामुळे विखे पाटलांनी असा प्रश्न उपस्थित केला का ? अशी चर्चा होऊ लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *