Wed. Jun 26th, 2019

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी राधाकृष्ण विखे-पाटील यांची ‘ही’ मागणी

0Shares

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी गाजलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. विधानसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासावेळी धनगर आणि मुस्लिम आरक्षणा संदर्भात चर्चा झाली.

सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे मराठा आरक्षणाच्या विधेयकाला दोन्ही सभागृहामध्ये मंजूरी मिळाली आहे. आज विधेयक राज्यपालांच्या मंजूरीसाठी पाठवण्यात येईल. आरक्षण, दुष्काळ या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर आज शेवटच्या दिवशी काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरेल.

विधिमंडळ अधिवेशनच्या आजच्या शेवटच्या दिवशी कामकाजाला सुरुवात झाली. यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचा आनंद आहे.  मात्र, याचा जल्लोष कशाला करता, असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सरकारला विधानसभेत केला.

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावे, विधानसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान राधाकृष्ण विखेपाटलांनी मागणी केली. सेच, मुस्लीम आरक्षणासंदर्भात सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: