Fri. Jan 21st, 2022

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शिवसेनेत यावं – संजय राऊत

लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे-पाटील यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित भाजप पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा शिवसेनेत यावं अशी ऑफर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

संजय राऊत काय म्हणाले ?

सुजय विखे-पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर तुम्ही शिवसेनेत यावं आणि युती मजबूत करावी असे संजय राऊत यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं.

यापूर्वी बाळासाहेब आणि राधाकृष्ण विखे-पाटीलांना शिवसेनेने मंत्रीपद दिले होते.

मात्र आता त्यांची तिसरी पिढी देखील युतीसोबत जात असल्याने ही चांगली गोष्ट असल्याचे संजय राऊत म्हणाले.

तसेच युतीवेळी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी वक्तव्य केलं होतं.

मात्र त्यांनी आता तपासायला हवं. जे स्वत:च घर सांभाळू शकत नाही त्यांनी राजकारणात संयम ठेवायचा असतो.

तसेच उद्धव ठाकरेंवर टीका करताना भान ठेवायला हवा होता.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी भान ठेवायला होता कारण भविष्यात काय वाढून ठेवलयं ते त्यांनी बघायला हवं होतं, असेही त्यांनी म्हटलं आहे.

आता राज्य सरकारवर टीका करण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही त्यामुळे तुम्ही शिवसेनेत यावं असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *