Sun. Jun 16th, 2019

राधाकृष्ण विखे- पाटील भाजपात प्रवेश करणार नाही – सुजय विखे

135Shares

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर अहमदनगर येथून उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र सुजय विखे यांच्या भाजपा प्रवेशामुळे राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र सुजय विखे पाटील यांनीच या चर्चेला पूर्णविराम लावत राधाकृष्ण विखे पाटील भाजपात प्रवेश करत नसून ते फक्त मला पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट केले.

राधाकृष्ण विखे-पाटील यांचा भाजपा प्रवेश ?

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केला.

भाजपात प्रवेश केल्यावर त्यांना अहमदनगरमधून उमेदवारी देण्यात आली.

त्याचबरोबर सुजय विखे यांचे वडिल राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा केली जात होती.

मात्र सुजय विखे पाटील यांनीच या प्रश्नचे उत्तर देत राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपात प्रवेश करत नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

तसेच माझ्या विजयासाठी माझा प्रचार करत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

 

135Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *