Sun. Jan 16th, 2022

कोल्हापूरमधील राधानगरी धरण भरले! स्वयंचलित दरवाजे उघडण्यास सुरूवात

गेल्या काही दिवसात कोल्हापुरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडायला सुरूवात झाली आहे. कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या काही दिवसात कोल्हापुरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे काही धरणांमध्ये धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोल्हापूरमधील राधानगरी धरणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडायला सुरूवात झाली आहे. कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र धोक्याची पातळी ओलांडल्याने भीती पसरली आहे.

राधानगरी धरणाने धोक्याची पातळी ओलांडली?

राधानगरी मधून 2828 क्यूसेकचा विसर्ग झाला असून सकाळी ११-३० वा राधानगरी धरणाचा सहावा स्वयंचलित दरवाजा उघडले आहे.

यामुळे 1428 क्यूसेक तर पायथा गृहातून 1400 असा एकूण 2828 क्यूसेकचा विसर्ग सुरु झाला आहे.

तसेच राधानगरी धरणाचे गेट क्रमांक 3 आज दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी उघडण्यात आला आहे.

त्यातून विसर्ग 1428 आहे एकूण गेट नंबर 3, गेट नंबर 5, आणि गेट नंबर 6 ही एकूण निसर्ग 4284 क्यूसेस विसर्ग सुरू आहे.

पावर हौस मधुन 1400 असा एकूण 5684 विसर्ग होत आहे अशी माहिती पाठबंधारे कडून मिळाली आहे.

राधानगरी धरणात पाणी वाढल्याने कोल्हापूरला महापुराचा धोका निर्माण झाला आहे.

राधानगरी धरणाचे 3 आणि 6 नंबरचे स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत.

मोठ्या प्रमाणात नदी पात्रात विसर्ग सुरू असून पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *