Sat. Dec 14th, 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टच, त्यांना तुरुंगात टाका – राहुल गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल विमान करारावरून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल चढवला.

राफेल करार होण्यापूर्वी अनिल अंबानी यांनी फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या भेटीचा धागा पकडत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरोपी ठरवले.

राफेल विमान करारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानींसाठी मध्यस्थाची भूमिका बजावली होती.

असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

तसेच नरेंद्र मोदी हे भ्रष्ट व्यक्ती असून, अनिल अंबानी यांना गोपनीय माहिती देऊन त्यांना गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केला आहे.

त्यासाठी त्यांच्यावर खटला चालवून त्यांना तुरुंगात डांबले पाहिजे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

राफेल विमान खरेदी करार होण्याच्या पंधरवडाभर आधी उद्योगपती अनिल अंबानी हे फ्रान्सचा संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांना भेटले होते, असे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने प्रकाशित करून राफेल काराराबाबत नवा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर या प्रकरणावरून राहुल गांधी यांनी आक्रमक पवित्रा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, राफेल करारप्रकरणी एक ईमेल समोर आला आहे.

एअरबस कंपनीचे एक्झिक्युटिव्ह यांच्याशी संबंधित असलेल्या या ईमेलमध्ये फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयाच्या कार्यालयात अनिल अंबानी गेले होते, असा उल्लेख आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *