Jaimaharashtra news

बंगळुरुच्या ‘एअर शो’मध्ये राफेलही सामिल

 

बंगळुरु येथील यालहंका एअरबेसवर मंगळवारी सरावादरम्यान सुर्यकिरणlच्या दोन विमानांनामध्ये टक्कर झाल्यानंतर आज याचठिकाणी पाच दिवसीय ‘एअर शो’ला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे या एअर शोमध्ये राफेल विमानानेही उड्डाण घेतली आहे. संरक्षणमंत्री निर्मला सितारमन यावेळी उपस्थित होत्या. मंगळवारी झालेल्या अपघातामुळे सूर्यकिरण विमानांनी या एअर शोमध्ये सहभाग घेतला नाही. या एअर शोमध्ये अमेरिकेचे बोइंग विमान, एच 145 हेलिकॉप्टर, फ्रान्सचे एअरबस एच 135 आणि इतर अन्य 100 पेक्षा जास्त विमान कंपन्यांनी या प्रात्यक्षिकांमध्ये भाग घेतला आहे.

‘एअर शो’मध्ये राफेल विमान –

सध्या चर्चेत असलेले राफेल विमानाने सुद्धा या एअर शोच्या प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेतला आहे.

राफेल विमानाने प्रात्यक्षिक दाखवल्यानंतर उपस्थितीतांनी राफेल विमानाची स्तुती केली.

त्यानंतर राफेलने मंगळवारी झालेल्या अपघाता शहीद झालेल्या वैमानिकाला श्रद्धांजली वाहिली.

राफेल विमानात विशेष काय ?

राफेल विमानात हवेतून हवेत मारा करण्याची क्षमता आहे.

तसेच हवेतून जमिनीवर आक्रमण करण्याचीही क्षमता आहे.

अणुबॉम्ब टाकण्यामध्ये राफेल सक्षम आहे.

इलेक्ट्रॉनिक वायफेअर सिस्टिममुळे शत्रूंचा पत्ता माहीत होतो.

 

 

 

 

 

 

Exit mobile version