Mon. Jul 22nd, 2019

गोव्यात राहुल गांधी- पर्रिकर भेट, विचारपूस तब्येतीची की ‘राफेल’ची?

45Shares

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेतली. त्यामुळं तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. पण काँग्रेसचे विरोधी पक्षनेते चंद्रकांत कोवळेकर यांनी या चर्चेला पूर्णविराम देत ही भेट खासगी असल्याचे सांगितले आहे.

मुख्यमंत्री कार्यालयात वैयक्तिक कारणासाठी भेट?

राहुल यांनी पर्रिकरांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याचंही त्यांनी नमूद केलं. संसदेच्या नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनानंतर सुट्टी घालवण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी अध्यक्ष सोनिया गांधी दक्षिण गोव्यात दाखल झाले आहेत. राहुल गांधी यांनी मुख्यंमत्री कार्यालयात जाऊन मनोहर पर्रिकर यांची भेट घेतली. आपली भेट ही कोणत्याही राजकीय कारणासाठी नसल्याचा निर्वाळा राहुल गांधी यांनी ट्वीटमार्फत दिला आहे.

 

राफेल प्रकरणी बोलणी?

काही दिवसांपूर्वी काँग्रेसने एक ऑडीओ क्‍लीप प्रसारीत केली होती. ज्‍यामध्ये मनोहर पर्रिकर यांनी मंत्री विश्वजीत राणे यांना राफेल संबंधीची कागदपत्रे आपल्‍या बेडरूम मध्ये असल्‍याचे म्‍हटलं होतं. त्यामुळे राहुल गांधी यांनी मंगळवारी राफेल प्रकरणासंदर्भातच मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली असल्याचा तर्क राजकीय वर्तुळात लावला जात आहे.

45Shares

Leave a Reply

%d bloggers like this: