रघुराम राजन यांचा मोदी सरकारला रोजगार निर्मिती संदर्भात इशारा
रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा केंद्र सरकारला बेरोजगारी संदर्भात गंभीर इशारा

रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भवन्सच्या एसपी जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्चने आयोजित केलेल्या सेंटर फॉर फायनॅनशियल स्टडिजच्या विद्यार्थ्यांसाठीच्या वेबिनारमध्ये बोलत त्यांनी केंद्र सरकारला बेरोजगारी संदर्भात गंभीर इशारा दिला आहे.
भारतात बेरोजगारीचे प्रमाण वाढत असल्याचं आणि भारतामध्ये वेळीच रोजगार निर्मिती झाली नाही तर देशातील तरुण रस्त्यावर उतरुन आंदोलन करतील अशी चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडिया आणि खोट्या बातम्यांच्या आधारे तरुणांना फार काळ अडकून ठेवता येणार नाही म्हणून वेळीच रोजगार निर्मिती न केल्यास तरुण मुले ही रस्त्यावर उतरली त्यामुळे रोजगार निर्माण करायला पाहिजे नाही तर यांचे परिणाम देशावर घात पडेेल असं रघुराम राजन यांनी म्हटलं आहे.
रघुराम राजन यांनी म्हटले की मूळ मुद्द्यांपासून तरुणांना विचलित करण्यासाठी सोशल नेटवर्किंग आणि खोट्या बातम्याद्वारेे आकर्षित करता येते मात्र ते अधिक काळ चालणार नाही. यापूर्वी भारताने इतर देशांवर दबाव निर्माण करण्यासाठी केंद्र सरकराच्या ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेअंतर्गत आयातीसंदर्भातील उपक्रम राबवला होता मात्र त्यात फारसे यश आलं नव्हतं, अशी आठवण देखील राजन यांनी यावेळी करुन दिली.
राजन यांनी सांगितलं चीनच्या निर्यातीत वाढ होण्यामागे तेथील असेम्बली मार्केट आहे. चीनमध्ये वेगवेगळ्या वस्तू एकत्रित करुन करण्यात येणारे उत्पादन म्हणजेच वेगवेगळ्या प्रोडक्ट निर्मिती केली जाते आणि त्यांची निर्यात केली जाते. हे उत्पादन भरमसाठ होते याद्वारे चीन वेगवेगळ्या देशात मार्केट बनवितो आणि जास्त जास्त वस्तू निर्यात करतो. त्यामुळेच चीन विकास हा झपाट्याने झाला आहे. भारतात सुद्धा असं वातावरण निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे,” असं राजन यांनी यावेळी म्हटलं.