Wed. Jun 23rd, 2021

शपथविधीसाठी राहुल गांधींसह सोनिया गांधी राहणार उपस्थित

लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर जनतेने एनडीएला पसंती दिली आहे. देशभरात 542 जागांसाठी निवडणुका पार पडल्यानंतर एनडीए 354 जागांवर निवडून आले. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपा सत्ता स्थापन करणार असल्याचे स्पष्ट झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींना भेटून सत्ता स्थापन करण्याचा दावा केला. 30 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदासाठी शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, गुलाबनबी आझाद उपस्थित असणार असल्याचे म्हटलं आहे.

हे पण लावणार शपथविधीला उपस्थिती –

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान पदासाठी शपथ घेणार आहेत.

30 मे रोजी सायंकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनात शपथविधी पार पडणार आहेत.

या शपथवविधीसाठी अनेक दिग्गज मंडळींना निमंत्रण देण्यात आले आहे.

यामध्ये अभिनेत्री आणि मक्कल निधी मय्यम पक्षाचे संस्थापक कमल हसन यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

त्याचबरोबर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी आणि गुलाबनबी आझाद उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मात्र मंगळवारी शपथविधी जरूर जाणार असल्याचे म्हणारेे तृणमूल कॉंग्रेसचे अध्यक्षा ममता बॅनर्जी हजेरी लावणार नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

कॉंग्रेसचा दारूण पराभव –

देशभरात भाजपाने कॉंग्रेसचा दारूण पराभव केला आहे.

त्यामुळे कॉंग्रेस सध्या निराश असून त्यांच्यामध्ये तणावाचे वातावरण दिसून आले आहे.

तसेच राहुल गांधी सध्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचेही म्हटलं जात आहे.

मात्र अद्याप कुठल्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *