Fri. Apr 19th, 2019

पंतप्रधान मोदींची नक्कल करत राहुल गांधींची घणाघाती टीका

0Shares

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान 18 एप्रिलला पार पडणार असून राजकीय नेते प्रचारसभा घेत आहेत. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींची लोकसभेतील भाषणाची नक्कल करत त्यांच्या भाषणाची खिल्ली उडवली.

काय म्हणाले राहुल गांधी ?

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली.

राफेल करारावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

लोकसभेतील भाषणाची नक्कल करत राहुल गांधी यांनी मोदी यांच्या भाषणाची खिल्ली उडवली आहे.

त्याचबरोबर राफेल संदर्भात प्रश्न विचारल्यावर मोदी यांनी दिड तास भाषण केले.

मात्र विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मोदींनी दिले नसल्याचेही त्यांनी म्हटलं.

त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाची खिल्ली उडवत पुन्हा नक्कल केली.

यावेळी त्यांनी चौकीदार चोर असल्याचेही राहुल गांधींनी म्हटलं आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *