पंतप्रधान डरपोक आहेत- राहुल गांधी

काही महिन्यांवर निवडणूक असताना कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी डरपोक आहे अशी टीका केली आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी माझ्यासोबत राफेल करार आणि देशाच्या सुरक्षेवर वादविवाद करावा असं आव्हान दिलं आहे. मात्र पंतप्रधान मोदी वादविवाद करण्यापासून घाबरत असल्यामुळे ते त्यापूर्वीच पळून जातील असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. दिल्लीतील कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक संमेलनात संबोधित करत असताना राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.
राहुल गांधी काय म्हणाले ?
भारतातील महत्तावाच्या संस्था कुठल्या पक्षाचे नसून ते देशातील जनतेचे आहे.
या संस्थेचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. मग तो कॉंग्रेस पक्ष असो किंवा इतर पक्ष.
भाजप सरकारला वाटते की ती राष्ट्रापेक्षा उच्च आहेत. मात्र ३ महिन्यात त्यांना कळेल की ते राष्ट्रापेक्षा उच्च आहेत की नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० मिनिटं राफेल करारावर बोलावे.
२०१४ साली नरेंद्र मोदी हे १५ वर्ष सत्तेत असतील असे होते. मात्र ५ वर्षातच कॉंग्रेसने शेतकऱ्यांची समस्या, भ्रष्टाचार आणि देशाचे संरक्षणाबद्दल मोदींना उघड केले.
कॉंग्रेस २०१९च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी, भाजप आणि संघाचा पराभाव करेल.