राहुल गांधीच्या कारवर तुफान दगडफेक; भाजपच्या गुंडांनी हल्ला केल्याचा आरोप
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर गुजरातमध्ये हल्ला झाला आहे. राहुल गांधींच्या कारवर दगडफेक करण्यात आली.
राहुल गांधीच्या कारच्या काचा फुटल्या असल्या तरी ते या दगडफेकीतून थोडक्यात बचावले आहेत. या हल्ल्यानंतर राहुल गांधींना काळे झेंडे दाखवण्यात आले.
मी काळे झेंडे दाखवणाऱ्यांना घाबरत नाही असे म्हणत राहुल गांधीनी हल्लेखोरांना सडेतोड उत्तर दिले आहे.
भाजपच्या गुंडांनी हल्ला केल्याचा आरोपही राहुल गांधीनी केला आहे.