राजकारण्यांनाही निवृत्तीचं वय असावं – राहुल गांधी

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर या दिवसांमध्ये राहुल गांधी महाराष्ट्र दौ-यावर आहेत.यामध्ये आज पुण्यात राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळेस विद्यार्थ्यांकडून सध्याच्या चालू घडामोडींवर काही राजकिय,सामाजिक, शैक्षणिक अशा क्षेत्रातील प्रश्न विचारले, यांना राहुल गांधीनी देखील प्रश्नांची उत्तरे दिली. पुण्यातील या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आरजे मलिष्का आणि अभिनेता सुबोध भावे यांनी केले.या कार्यक्रमात राहुल गांधी राजकारणातून निवृत्त होण्यासाठी वयोमर्यादा असावी, असं म्हणत त्यांनी नाव न घेता मोदींवर टीका केली आहे. या दरम्यान रॅपिड फायरच्या प्रश्नोत्तरामध्ये राहुलने त्याच्या आजीची आठवण सांगितली ,यावेळी एका राजकारण्याच्या मनातला हळवा चेहराही पाहायला मिळाला.

हे होते विदयार्थ्यांचे प्रश्न

राहुल गांधी यांनी 5000 महाविदयालयीन विद्यार्थ्यांसोबत या संवाद अगदी हलक्या फुलक्या प्रश्नाने सुरूवात झाली.

राजकारणात महिलांचा  सहभाग महत्वाचा आहे ? :

आम्ही सत्तेत आल्यावर महिलांना लोकसभा  निवडणुकीत  33 टक्के आरक्षण देऊ.

राष्ट्रीय पातळीवर  महिलांना  33  टक्के नोकऱ्या देण्यात येतील.

लोकसभा व राज्यसभा निवडणुकीत  33 टक्के जागा देणार असल्याचे देखील राहुल गांधी यांनी यावेळेस सांगितले.

बेरोजगारीच्या प्रश्नावर राहुलचे हे  उत्तर :

आपल्या देशातील 27 हजार नोकरी दर 24 तासाला आपण गमावत आहोत.

आपल्याकडे  कौशल्याला अर्थव्यवस्थेची जोड मिळत नाही तसेच त्याचा आदरही केला जात नाही.

त्यासाठी इको सिस्टीम बनवायची गरज आहे, आपली विद्यापीठे व कंपनींना एकत्र जोडण्याची गरज आहे.

10 लाख रोजगार पंचायत स्तरावर निर्माण करणार असल्याची घोषणा केली आहे.

22 लाख रोजगार निर्माण करणार असल्याचही ते म्हणाले.

नोटाबंदींवर निशाणा 

नोटबंदीमुळे 2 टक्के जीडीपी कमी झालं,लाखो नोकऱ्या गेल्या.

नोटबंदीमुळे झालेले  नुकसान भरून निघणार नाही.

नोटबंदीनंतर धक्का बसलेली अर्थव्यवस्था सावरायला प्रयत्न करावे लागणार आहेत.

मोदींवर निशाणा

राजकारणातून निवृत्त होण्यासाठी वयोमर्यादा असावी असं म्हणत त्यांनी नाव न घेता मोदींवर टीका केली आहे,

मोंदीबद्दल मनात अजिबात व्देष नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

या कार्यक्रमादरम्यान त्यांनी मोदींच्या नावाच्या घोषणा दिल्या आहेत.

Exit mobile version