Jaimaharashtra news

राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपद सोडण्यावर ठाम, Twitter वर केले ‘हे’ बदल!

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज अखेर अधिकृतरीत्या पक्षाध्यक्षपदाचा पदभार सोडला आहे. पक्षासाठी नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी पक्षाच्या कार्यकारिणी समितीने निवडणूक घेऊन निर्णय घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. यासंदर्भात राहुल गांधी यांनी ट्विटर पत्र पोस्ट केलं आहे.


‘लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत मी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीने निवडणूक घेऊन नव्या अध्यक्षाची नेमणूक करावी’, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय.

Twitter वरील आपल्या Bio मधूनही त्यांनी Congress President काढून टाकलं.

बुधवारी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी 40 मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली मंगळवारी कॉंग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची राहुल गांधी यांच्यासोबत बैठक झाली. बैठकीत कॉंग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. मात्र राहुल गांधी आपल्या राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम होते.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनीच पक्षाचं नेतृत्व करावं यासाठी त्यांना वारंवार विनंती केली जात होती. त्यांचा राजीनामाही स्वीकारला जात नव्हता. मात्र राहुल गांधी आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी आज अधिकृतरीत्या आपण पक्षाध्यक्ष नसल्याचं म्हणत नवा पक्षाध्यक्ष गांधी – नेहरू परिवारातील नसावा असंही म्हटलं आहे.

Exit mobile version