Tue. Jul 14th, 2020

राहुल गांधींचा काश्मीर दौरा रद्द, श्रीनगरहून परत पाठवलं

राहुल गांधी, गुलाम नबी आझाद, डी राजा, शरद यादव, मनोज झा, माजिद मेमन आणि इतर नेत्यांच्या शिष्टमंडळाला श्रीनगर विमानतळावरुनच परत पाठवण्यात आले.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा आजचा काश्मीर दौरा रद्द करण्यात आला आहे. ते विरोधी पक्ष नेत्यांसह काश्मीरकडे रवाना झाले होते. परंतु त्यांना श्रीनगर विमानतळावरच रोखण्यात आलं आणि परत पाठवण्यात आलं. सुरक्षेच्या कारणास्तव राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत आलेल्या विरोधी पक्ष नेत्यांच्या शिष्टमंडळाला परत पाठवण्यात आल्याचं बोललं जात आहे.

कलम 370 रद्द झाल्यानंतर काश्मीरचा दौरा करण्याचे राहुल गांधी यांनी जाहीर केलं होत. त्यांच्यासोबत 11 नेत्यांच शिष्ठमंडळ देखील काश्मीरसाठी रवाना झाले होते. मात्र श्रीनगर विमानतळावर राहुल गांधी आणि इतर सगळ्यांना रोखण्यात आले आणि परत पाठवण्यात आले.

यामध्ये राहुल गांधी, गुलाम नबी आझाद, डी राजा, शरद यादव, मनोज झा, माजिद मेमन आणि इतर नेत्यांच्या शिष्टमंडळाला श्रीनगर विमानतळावरुनच परत पाठवण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना परत पाठवण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *