Wed. Jan 19th, 2022

राहुल गांधी न्यायालयाचा अवमान करतात – निर्मला सीतारमन

राफेल प्रकरणी फ्रान्ससोबत करण्यात आलेल्या करारावर केंद्र सरकारने घेतलेल्या आक्षेपासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. राफेल करारासाठी जी कागदपत्र सादर करण्यात आली होती, त्यांच्याविरोधात केंद्र सरकारने आक्षेप घेतला होता. मात्र आता या कागदपत्रांना सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली. यासंदर्भात बोलण्यासाठी संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी पत्रकार परिषद घेतली.

काय म्हणाल्या निर्मला सीतारमन ?

राफेल करारावर केंद्र सरकारने आक्षेप घेतल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल जाहीर केला आहे.

राफेल घोटळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला मोठा दणका दिला.

यामुळे संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली आहे.

काँग्रेस अध्यक्ष यांनी सांगितलेल्या गोष्टी खोटे असून सर्वोच्च न्यायालयाने असे काही म्हटलं नसल्याचे म्हटलं आहे.

राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा पहिला पॅराग्राफही वाचला नसून पंतप्रधान मोदींवर टीका करत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

तसेच ‘चौकीदार चोर है’ हे सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केले असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

मात्र असे काही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले नसून राहुल गांधी न्यायालयाचा अवमान करत असल्याचे सीतारमन यांनी म्हटलं आहे.

तसेच निकालाचा चुकीचा अर्थ लावण्याचा अधिकार राहुल गांधींना कोणी दिला असा प्रश्नही उपस्थित केला.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *