Mon. Aug 8th, 2022

Election 2019: राहुल गांधी नांदेडमधून लढणार निवडणूक?

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी नांदेड लोकसभेच्या मतदारसंघात निवडणुकीसाठी उभे राहणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. नांदेड लोकसभा मतदार संघ हा काँग्रेससाठी अतिशय सुरक्षित मतदारसंघ मानला जातो.

नांदेड लोकसभेचा मतदारसंघ किती सुरक्षित?

नांदेड लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ आहेत.

त्यापैकी नांदेड दक्षिणच प्रतिनिधित्व शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील करतायत.

मुखेड विधानसभा मतदार संघात भाजपचे आमदार गोविंद राठोड यांचे अकाली निधन झाले होते.

त्यानंतर झालेल्या पोट निवडणुकीत त्यांचे पुत्र तुषार राठोड विजयी झाले होते.

अनुसूचित जातिसाठी आरक्षीत असलेल्या देगलूर येथे सेनेचे सुभाष साबणे हे आमदार आहेत.

उरलेल्या नांदेड उत्तर, भोकर, आणि नायगावात काँग्रेसचे आमदार आहेत.

नांदेड उत्तर, भोकर आणि नायगांव हे तिन्ही मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला  आहेत.

शिवाय जिल्ह्यातील बहुतांश सर्वच स्थानिक स्वराज संस्था ह्या काँग्रेसच्या ताब्यात आहेत.

कॉंग्रेससाठी नांदेड लोकसभा हा सुरक्षीत मतदार संघ मानला जातो.

नांदेड लोकसभेसाठी अमि  ता अशोक चव्हाण यांना निवडनुकिसाठी उभे करावे अशी मागणी केली जातेय.

राहुल गांधींना इथे उभे केल्यास अशोक चव्हाण जीवाच रान करतील.

तसेच गांधींना निवडून आणतील असा एक मतप्रवाह आहे.

काँग्रेसच्या गोटात नांदेड लोकसभेसाठी राहुल गांधींचा विचार केला जातोय.

नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने राहुल गांधींसाठी अत्यंत सुरक्षित मतदारसंघ मानला जातोय.

गेल्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी नरेंद्र मोदींनी नांदेडमध्ये सभा घेतली होती.

तेव्हा सभेला लाखोंचा जनसमुदाय जमला होता.

मात्र त्याच निवडणुकीत अशोक चव्हाणांना 4 लाख 93 हजार 75 मतं मिळाली होती.

तर भाजप उमेदवार दिगंबर पाटील यांना 4 लाख 11 हजार 620 मतं मिळाली होती.

82 हजारच्या मतांच्या फरकाने अशोक चह्वाण विजयी झाले होते.

लोकसभा निवडणुकीचा इतिहास

1980 – शंकरराव चव्हाण (काँग्रेस)

1984 – शंकरराव चव्हाण (काँग्रेस)

1987 – अशोक चव्हाण (काँग्रेस)

पोटनिवडणूक 1989 – डॉ. व्यंकटेश काबदे (जनता दल)

1991 –  सूर्यकांता पाटील  (काँग्रेस)

1996 –  गंगाधर कुंटुरकर (काँग्रेस)

1998 –  भास्करराव खतगावकर (काँग्रेस)

1999 –  भास्करराव खतगावकर (काँग्रेस)

2004 –  दिगंबर पाटील (भाजप)

2009 –  भास्करराव खतगावकर (काँग्रेस)

2014 –  अशोक चव्हाण (काँग्रेस)

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.