सर्जिकल स्ट्राईक तर लष्कराने केला – राहुल गांधी

सर्जिकल स्ट्राईक मोदींनी नव्हे आपल्या लष्कराने केला असं मत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केलं आहे. काँग्रेस मुख्यालयात राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी भाजपासहित पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष केलं आहे. लष्कराचा कोणीही अपमान करू नये तसचं स्वायत्त असणारे निवडणूक आयोग सध्या पक्षपातीपणाने वागत असल्याचा आरोप देखील राहुल गांधी यांनी केला आहे. भाजप लोकसभा निवडणूक हरणार असल्याचा विश्वास त्यांनी या पत्रकार परिषदेत केला आहे.

काय म्हणाले राहुल गांधी ?

सर्जिकल स्ट्राईक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्हे आपल्या भारतीय लष्कराने केला आहे.

लष्कराचा कोणीही अपमान करू नये असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

भाजप लोकसभा निवडणूक हरणार आहे् असा विश्वास राहुल गांधींना व्यक्त केला आहे.

काँग्रेसने मोदींना उद्ध्वस्त केलं असून तुमच्यासमोर त्यांचा केवळ पोकळ सांगाडा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अनेक स्वायत्त आणि महत्त्वाच्या संस्था मोडीत काढल्याची टीका केली.

स्वायत्त असणारे निवडणूक आयोग सध्या पक्षपातीपणाने वागत आहे असं आरोप यावेळी करण्यात आला.

न्याय योजनेद्वारे गरिबांच्या खात्यात थेट पैसे जमा करणार’ असे आश्वासन यावेळी राहुल गांधींनी दिलं.

बेरोजगारी हा यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा मुख्य मुद्दा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलय.

Exit mobile version