Tue. Apr 7th, 2020

मोदी हे भ्रष्टाचाराचं दुसरं नाव – राहुल गांधी

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

आज दिल्लीमध्ये काँग्रेसच्या महाअधिवेशनाची सांगता झाली, तेव्हा राहुल गांधी यांनी भाजपवर अनेक टीकास्त्र सोडली. याशिवाय, भाजप म्हणजे संघाचा आवाज असल्याचंही ते यावेळी म्हणाले. मोदी हे भ्रष्टाचाराचं दुसरं नाव आहे असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरव मोदी आणि ललित मोदींसारख्यांचं भलं केलं तर अमित शाहांच्या मुलाला गडगंज केलं. पण सामान्य माणसाकडे दुर्लक्ष केलं,” अशी टिकाही राहुल यांनी यावेळी केली. शिवाय सत्तेत आल्यावर आम्ही तरुणांना रोजगार देऊ आणि शिक्षणाला प्राधान्य देऊ असं ते यावेळी बोलले. तसेच मध्य प्रदेशमधील व्यापम घोटाळ्यावरुनही शिवराज सिंह सरकारवर टीकेची झोड उठवली.

तसेच येणाऱ्या काळात काँग्रेसमध्ये अमुलाग्र बदलाची गरज आहे असं मतही राहुल गांधींनी यावेळी व्यक्त केलं. पक्षातील दुराव्यांविषयी बोलताना, पक्षामध्ये नेते आणि तरुण कार्यकर्त्यांमध्ये उभ्या असलेल्या भिंतीला पाडण्याचा संकल्प राहुल गांधी यांनी केला. तसेच, तरुण मतदार आणि काँग्रेस नेत्यांमधलं अंतर कमी करण्याची गरज असल्याचंही ते यावेळी म्हटलं.

कार्यकर्त्यांनी कुणालाही न घाबरण्याचा सल्ला राहुल गांधींनी दिला. देशाची मान उंचवायची असेल, तर फक्त एका धर्माला नाही. तर सर्व धर्मांना सोबत घेऊन पुढे जावं लागेल, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. तसेच 2019च्या निवडणूकीत काँग्रेसचीच सत्ता येईल असा विश्वास दिला.

महासभेतील महत्त्वाचे मुद्दे :

मोदींवरील टिका :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरव मोदी आणि ललित मोदींसारख्यांचं भलं केलं तर अमित शाहांच्या मुलाला गडगंज केलं. पण सामान्य माणसाकडे दुर्लक्ष केलं

मोदी हे भ्रष्टाचाराचं दुसरं नाव आहे.

मध्य प्रदेशमधील व्यापम घोटाळ्यावरुनही शिवराज सिंह सरकारवर टीकेची झोड उठवली.

मोदींना 2019च्या निवडणूकीची भीती वाटत आहे.

भाजप सत्तेसाठी काहीही करु शकतं, काँग्रेसचा जनतेसाठी काहीही करु शकतं

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या मुलीनं नीरव मोदीला मदत केल्याचा दावाही राहुल गांधी यांनी केला आहे.

काँग्रेस देशाचा आवाज, तर भाजप संघाचा आवाज. संघाला देशभरातील सर्व संस्था मोडित काढायच्या आहेत

चूक मान्य करण्याचा उदारपणा भाजपमध्ये नाही

राहूल गांधींची आश्वासन :

आमची विचारधारा जिंकत आहे. 2019 मध्ये काँग्रेस पक्ष नक्की निवडणूक जिंकणार.

आम्हाला प्रेमान लढायच आहे, द्वेशाने नाही. गरज पडली तर पुन्हा कर्जमाफी करू. उत्तम दर्जाच शिक्षण देऊ.

काँग्रेसचा हात सर्वांचं रक्षण करेल

संघाला देशभरातील सर्व संस्था मोडित काढायच्या आहेत

मध्य प्रदेशमधील व्यापम घोटाळ्यावरुनही राहुल गांधींचा भाजपवर निशाणा

देशाला बदलण्याची ताकद फक्त तरुणांमध्येच आहे

नेता आणि कार्यकर्तामधील भिंत आम्ही तोडणार

काँग्रेसनं कधीही द्वेषाचं राजकारण केलं नाही

देशातील तरुणांना रोजगार फक्त काँग्रेसच देऊ शकतो

भाजप सत्तेसाठी काहीही करु शकतं, काँग्रेसचा जनतेसाठी काहीही करु शकतं

युवकांना संरक्षण देण हेच आमचं काम आहे.

काम करत असलेल्या उमेदवारांच तिकीट मिशणार.

काँग्रेसनं कधीही द्वेषाचं राजकारण केलं नाही. देशातील तरुणांना रोजगार फक्त काँग्रेसच देऊ शकतो.भाजप सत्तेसाठी काहीही करु शकतं, काँग्रेसचा जनतेसाठी काहीही करु शकतं

शेतकऱ्यांची समस्या ही दुसरी मोठी समस्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *