Mon. Jul 22nd, 2019

‘त्या’ वादावर अखेर राहुल गांधींनी मौन सोडले

0Shares

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

चीनच्या राजदूतांची भेट घेतल्याने वाद निर्माण झाला असतानाच अखेर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी या वादावर मौन सोडले आहे.

 

मी चीनच्या राजदूतांची भेट घेतल्याने केंद्र सरकारला चिंता वाटत असेल तर सीमेवर तणाव असताना त्यांचे तीन मंत्री चीनमध्ये पाहुणचार का झोडत होते? यावर सरकारने

स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

 

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची चीनचे राजदूत ल्यूओ झाओहुई यांनी भेट घेतली. यावरुन वाद सुरु झाला असून भाजपनेही राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती.

 

या वादावर राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी म्हणाले, मी चीन आणि भूतानचे राजदूत, पूर्वोत्तर राज्यांमधील काँग्रेस नेते आणि माजी सुरक्षा

सल्लागार यांची भेट घेतली.

 

राहुल गांधी यांनी ट्विटरवर मोदी आणि शी जिनपिंग यांचे झोपाळ्यावर एकत्र बसलेला फोटोदेखील शेअर केला आहे. ‘सीमा रेषेवर एक हजार चिनी सैनिकांनी भारतीय

हद्दीत घुसखोरी केली असताना मी आरामात झोपाळ्यावर बसून राहणारा माणूस नाही’ असा टोला त्यांनी लगावला.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: