पुलवामा हल्ल्याला मोदी सरकारमधील जबाबदार कोण ? – राहुल गांधी

आजच्या दिवशी तमाम भारतीयांचे काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली होती. पुलवामा हल्ल्याला आज वर्ष पुर्ण झालं आहे. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या त्या हल्ल्यात भारतीय सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते.
या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे संपुर्ण भारतात शोकाकूल वातावरण निर्माण झाले होते. या घटनेमध्ये शहीद जवानांना आज देशभरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे.
दरम्यान कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान या घटनेवर संताप व्यक्त करत त्यांना मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदी सरकारला जबाबदार धरून काही प्रश्न विचारले आहेत.
काय म्हणाले राहुल गांधी?
आज जेव्हा आपण सगळे पुलवामा हल्ल्यातील 40 शहिदांची आठवण काढत आहोत, तेव्हा आपल्याला याही मुद्द्यांकडे लक्ष द्यायला हवे.
पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा सर्वात जास्त फायदा कोणाला झाला ? पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीत काय आढळलं ? हल्ल्याला अनुमती देणाऱ्या सुरक्षा यंत्रणेसाठी भाजप सरकारमधील जबाबदार कोण आहे ? असे प्रश्न त्यांनी व्टिटमधून मोदी सरकारला विचारले आहेत.
यावरून राहुल गांधीनी मोदी सरकारला धारेवर धरत टीका केली आहे. आता राहुल गांधीच्या या प्रश्नांना मोदी सरकार काय प्रत्यूत्तर देणार हे याकडे सर्वांचे लक्ष असेल.