२०% गरीब कुटुंबाना वर्षाला ७२ हजार रुपये देणार – राहुल गांधी

आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोठी घोषणा केली आहे. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत कॉंग्रेस सत्तेत आल्यास गरिबांना प्रति महिना १२ हजार देणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच २०% गरीब कुटुंबाना वर्षाला ७२ हजार रुपये देणार असल्याचे राहुल गांधींनी सांगितले. गरिबांना उत्पन्नाची हमी देणार असल्याचाही दावा केला आहे. जसजसं लोकसभा निवडणुकींच्या तारखा जवळ येत आहेत तसतसं राजकीय पक्ष प्रचार आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी सज्ज झाली आहेत.
राहुल गांधींची मोठी घोषणा –
२०% गरीब कुटुंबाना वर्षाला ७२ हजार रुपये देणार असल्याचे राहुल गांधींनी सांगितले.
गरिबांना किमान उत्पन्नाची हमी देणार.
५ कोटी कुटुंब आणि २५ कोटी जनतेला याचा थेट फायदा होणार.
वर्षातून एका कुटुंबाला ७२ हजार रुपये देणार.
जगात अशी योजना कुठेच नसल्याचे राहुल गांधी म्हणाले आहेत.
बॅंक अकाऊंटमध्ये थेट पैसे जमा होणार