म्हणून राहुल गांधींनी राज्यात जास्त सभा घ्याव्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपूर्ण राज्यात प्रचार सभा घेत आहेत. प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर घणाघाती टीका करत आपल्या कामाचा पाढा वाचत आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी प्रचारासाठी महाराष्ट्रात आल्याने मुख्यमंत्र्यांनी टीका केली आहे. राहुल गांधी जिथे सभा घेतील तिथे युतीचा विजय होणार असल्याचे निश्चित असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे राहुल गांधींनी जास्तीत जास्त सभा घ्याव्यात असेही मुख्यमंत्री म्हणाले आहे. तसेच राष्ट्रवादीची अवस्था बिकट असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ?
दोन जागेवर सुद्धा निवडून येणार नाही म्हणून राहुल गांधी बॅंकॉकला पळाले आहेत.
राष्ट्रवादीची अवस्था बिकट असल्यामुळे आधे इधर जाओ और आधे उधर अशी परिस्थिती निर्माण झाले आहे.
मोदींच्या नेतृत्वामुळे विरोधकांना १५ ते २० वर्ष विरोधी पक्षात बसावं लागणार असल्याचा टोला विरोधकांवर लगावला आहे.
शेतकरी जेव्हा अडचणीत आले तेव्हा आम्ही तातडीने मदत केली आहे.
५० हजार कोटी शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे.
पुढच्या ४ वर्षात गावप्रकल्प पूर्ण करणार आहेत.
२० हजार किमी रस्ते पूर्ण केले आहेत.
समृद्धी महामार्ग मुळे 4 तासात बुलढाणा ते मुंबई जाता येणार आहे.
5 वर्षात 11 हजार गावात पिण्याच्या पाण्याची सोय केली.
41 लाख लोकांचे ऑपरेशन फुकट करण्याचे काम सरकारने केलं.
केंद्राकडून बचत गटाला 1 लाखाच कर्ज बिनव्याजी मिळणार आहे.