Mon. Dec 6th, 2021

राहुल गांधीनी केली मोदींवर टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. ‘अर्थसंकल्पात सैन्यांसाठी मोठी तरतूद नसल्यानं तसेच सैनिकांच्या पेन्शनमध्ये कपात करण्यात आल्यानं शिवाय शेतकरी आणि जवानांसाठी काहीच मोठी तरतूद केली नाही. त्यांच्यासाठी फक्त त्यांचे 3-4 उद्योगपती मित्रच देवासमान आहेत, असे टि्वट राहुल गांधींनी केले आहे. यापूर्वी 5 फेब्रुवारी रोजी राहुल गांधी यांनी ट्विट करून मोदी सरकारवर निशाणा साधला होता. अर्थसंकल्पामध्ये संरक्षण विभागासोबत धोका झाला आहे.

देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांच्या स्थितीमध्ये सुधारणा होईल यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद नसल्यानं राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीका केली असून भारतातील मालमत्ता आपल्या भांडवलशाही मित्रांना देण्याची योजना आखत असल्याचंही राहुल गांधी म्हटलं आहे. सरकारने देशातील बेरोजगारी कमी करण्यासाठी लघु व मध्यम उद्योग, शेतकरी आणि कामगारांना पाठिंबा द्यायला पाहिजे, असंही राहुल गांधी यांनी यापूर्वी सांगितलं होतं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारीला संसदेमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला होता. मात्र या अर्थसंकल्पात उद्योगपतीचा विचार करण्यात आला आहे अशी टीका राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *