Tue. Oct 26th, 2021

सदस्यपदी शपथ घेतल्यानंतर राहुल गांधी ‘हे’ विसरले

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठी आणि वायनाडमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र राहुल गांधी वायनाडमधून निवडून आले. राहुल गांधी यांनी सोमवारी चौथ्यांदा लोकसभा सदस्यपदी शपथ घेतली. यावेळी राहुल गांधी संसदेच्या नोंदणी पुस्तकात शपथ घेतल्यानंतर सही करायलाच विसरले.

नेमकं काय घडलं ?

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चौथ्यांदा लोकसभा सदस्यपदी शपथ घेतली.

राहुल गांधी केरळ येथील वायनाडमधून निवडून आले आहेत.

राहुल गांधींनी अमेठीमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

मात्र केंद्रीय मंत्री आणि भाजपाच्या नेत्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा पराभव करत निवडून आल्या होत्या.

सोमवारी राहुल गांधी यांनी लोकसभा सदस्यपदासाठी शपथ घेतली.

शपथ घेतल्यानंतर राहुल गांधी आपल्या जागेवर बसायला जात असताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना थांबवले.

संसदेच्या नोंदणी पुस्तकात सही केली नसल्याचे आठवण राजनाथ सिंह यांनी राहुल गांधींना सांगितले.

त्यानंतर राहुल गांधी यांनी नोंदणी पुस्तकात सही केल्यानंतर संसदेत टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *