Wed. Apr 14th, 2021

राहुल गांधी यांचं पुशअप्स चॅलेंज

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. राहुल गांधी यांचा पुशअप्स करतांनाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यापुर्वी देखील पुद्दुचेरीमध्ये मच्छिमारांसोबत बोलता बोलता अचानक पाण्यात उडी घेतांनाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता यावेळी तमिळनाडूमधल्या एका शाळेतला पुशअप्स मारतानाचा फोटो व्हिडीओ हा व्हायरल झाल्यानं पुन्हा एकदा राहुल गांधी चर्चेत आले आहे. सध्या राहुल गांधी तमिळनाडू दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर असतांना राहुल गांधींनी एका शाळेच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी पुशअप चॅलेंज घेतलं आणि या पुशअप्स चॅलेंज व्हिडिओ त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला असून तो तुफान व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यानी कमेंट केल्या आहे. शिवाय पुढील महिन्यात तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचारसभा आणि संबंधित कार्यक्रमांसाठी राहुल गांधी सध्या तमिळनाडू दौऱ्यावर आहेत. सोमवारी तमिळनाडूच्या मुलगमुड्डू या ठिकाणी असलेल्या सेंट जोसेफ मॅट्रिक स्कूलमध्ये राहुल गांधी विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते तर फिटनेसविषयी चर्चा सुरू असताना त्यांनी अचानक विद्यार्थ्यांना पुशअप चॅलेंज दिलं. या १०वीच्या मुलीने हे चॅलेंज घेतलं. राहुल गांधींनी हातातला माईक बाजूच्या उभ्या असलेल्या शिक्षकांकडे सोपवून पुशअप्स मारायला सुरुवात केली. त्या मुलीने देखील हळूहळू पुशअप्स सुरू केले. राहुल गांधींनी यांनी वेगाने १३ पुशअप्स मारले.

मेरोलिनाने धिम्या गतीने का होईना पण राहुल गांधींपेक्षा १ पुशअप जास्त मारले १४ पुशअप मारले. अखेर राहुल गांधींनी उभं राहून ‘मेरोलिना जिंकली’, असं जाहीर केलं. असं करण्यापूर्वी राहुल गांधींनी एका हाताने देखील एक पुशअप मारत उपस्थितांची दाद मिळवली. राहुल गांधींनी हा व्हिडिओ त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्यानंतर त्यावर त्यांच्या फॉलोअर्सच्या कौतुक करणाऱ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. हा व्हिडिओ हा तुफान व्हायरल झाला. गेल्याच आठवड्यात भिजलेल्या टीशर्टमधला विजेंद सिंगने ट्वीट केलेला राहुल गांधींचा फोटो देखील भलताच व्हायरल झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *